देशातील ५५ टक्के शहरी ग्राहक २५-७५ टक्के कमी साखरेची मिठाई खाण्यास तयार

नवी दिल्ली : देशातील निवडक ३११ जिल्ह्यांमधील घरगुती ग्राहकांकडून “भारतात मिठाई कशी वापरली जाते” या शीर्षकाच्या सर्वेक्षणाला ३६,००० हून अधिक प्रतिसाद मिळाले आहेत. उत्तर देणाऱ्यांमध्ये ६१ टक्के पुरुष आणि ३९ टक्के महिला होत्या. याव्यतिरिक्त, ४२ टक्के प्रतिसादकर्ते टियर १ शहरातील, २९ टक्के टियर २ शहरांमधील आणि २९ टक्के टियर ३ आणि टियर ४ जिल्ह्यांमधले होते. सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, उत्पादनांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याच्या चिंतेमुळे अनेक ग्राहकांनी कमी साखरेचे पर्याय ब्रँड विकसित केले जावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे.

सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, ५१ टक्के शहरी भारतीय कुटुंबे महिन्यातून तीन किंवा अधिक वेळा पारंपरिक भारतीय मिठाई खातात. २०२३ मधील हे प्रमाण ४१ टक्क्यांवरून २०२४ मध्ये ५१ टक्क्यांपर्यंत वाढेल. इतर गोड पदार्थांच्या संदर्भात, ५६ टक्के शहरी भारतीय कुटुंबे केक, बिस्किटे, आइस्क्रीम, शेक, चॉकलेट, कँडीज आणि तत्सम पदार्थ महिन्यातून तीन किंवा अधिक वेळा खातात, तर १८ टक्के कुटूंबे दररोज याचा वापर करतात. सर्वेक्षणात असेही आढळून आले की उत्पादनांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याच्या चिंतेमुळे अनेक ग्राहकांनी कमी साखरेचे पर्यायी ब्रँड विकसित करण्याची इच्छा व्यक्त केली. उल्लेखनीय म्हणजे, ५५ टक्के शहरी भारतीय घरगुती ग्राहक २५-७५ टक्के कमी साखरेसह पारंपरिक मिठाई, गोड बेकरी वस्तू आणि पॅकेज केलेले उत्पादन घेण्यास इच्छुक आहेत.

यामुळे उत्पादकांना, विशेषत: सणासुदीचा हंगाम जवळ आला असताना कमी साखरेचे प्रकार सादर करण्याचा विचार करण्याची संधी आहे. सर्वेक्षणात पारंपारिक भारतीय मिठाई दर महिन्याला किती वेळा वापरली जाते याबाबत विचारणा केली असता, १२,२४८ लोकांपैकी, १० टक्के लोकांनी दररोज पारंपरिक मिठाई खाल्ल्याचा अहवाल दिला. सहा टक्के लोकांनी त्यांचा महिन्यातून १५-३० वेळा मिठाई खाल्ली जाते, आठ टक्के लोकांनी महिन्यातून ८-१५ वेळा मिठाई खाल्ली जाते असे सांगितले. तर २७ टक्के लोकांनी महिन्यातून ३-७ वेळा मिठाई खाल्ली जाते, असे सांगितले. तर ३९ टक्के लोकांनी महिन्यातून १ ते २ वेळा त्याचा वापर केला जातो असे सांगितले.

केवळ चार टक्के लोकांनी सांगितले की ते पारंपरिक भारतीय मिठाई खात नाहीत, तर ६ टक्के लोकांनी स्पष्टपणे उत्तर दिले नाही. बेकरी, केक, बिस्किटे, आईस्क्रीम, शेक, चॉकलेट्स आणि कँडीज यांसारख्या पॅकेज केलेल्या उत्पादनांचा वापर १८ टक्के लोक दररोज वापर करतात. याव्यतिरिक्त, ४ टक्के लोक महिन्यातून १५-३० वेळा याचा वापर करतात. एकूणच, ५६ टक्के शहरी भारतीय कुटुंबे महिन्यातून तीन किंवा त्याहून अधिक वेळा ही उत्पादने वापरतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here