मुंबई : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने 50 बेसिस पॉइंट कपात केल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुरुवातीला उसळी पहायला मिळाली. सकारात्मक जागतिक संकेतांवर विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये काहीशी घसरण झाली. शेवटी सेन्सेक्स 236.57 अंकांनी वाढून 83,184.80 वर तर निफ्टी 38.25 अंकांनी वाढून 25,415.80 वर स्थिरावला.बँकिंग आणि FMCG क्षेत्रामध्ये खरेदी दिसून आली.
सेन्सेक्समध्ये एनटीपीसी, कोटक बँक, टायटन, नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक यांच्या शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली. तर अदानी पोर्ट्स, एल अँड टी, टीसीएस घसरण पाहायला मिळाली. निफ्टी मीडिया, ऑइल अँड गॅस, मेटल, पीएसयू बँक सेक्टरमध्ये 2.45 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. बीएसईवर 241 समभागांनी 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली.