सोलापूर : श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता कमी असून प्रतिकूल परिस्थितीत आम्ही कारखाना चालवित आहोत. तरीसुध्दा आजपर्यंत आसपासच्या कारखान्याच्या बरोबरीने ऊस दर दिलेला आहे. येणाऱ्या हंगामातही आसपासच्या कारखान्याच्या बरोबरीने ऊस दर देण्यात येईल. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासदांचे उन्नतीसाठी आम्ही प्रयत्न करीत आहे असे प्रतिपादन चेअरमन धनाजीराव साठे यांनी २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले. कारखान्याची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना स्थळावर पार पडली. यावेळी ते बोलत होते.
संचालक दादासाहेब साठे यांनी सांगितले की, सध्या साखर कारखान्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गाळप क्षमता वाढीबरोबरच उपपदार्थ निर्मिती प्रकल्प असणे आवश्यक आहे. याचा विचार करुन कारखान्याचे विस्तारीकरण, ३० केएलपीडी डिस्टिलरी, इथेनॉल प्रकल्प, १५ मे.वॅट सहवीज निर्मिती प्रकल्प हाती घेवून उभारणीचे काम लवकर सुरू होणार आहोत.हंगामामध्ये सुमारे २.५० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट आहे. त्याची तयारी वेगात सुरु आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.