कोल्हापूर : साखर कारखान्यांनी कामगारांची थकित देणी दिल्याशिवाय कोणत्याही सहकारी किंवा खासगी कारखान्यांना गाळपाची परवानगी देऊ नये अशी मागणी साखर कारखाना कामगार संघटनांनी केली आहे. अनेक साखर कारखान्यांनी कामगारांना हक्काच्या वेतनापासून दूर ठेवले आहे. प्रोव्हिडंट फंड थकित ठेवलेले आहेत. ग्रॅच्युइटी थकित ठेवलेली आहे. बेकार भत्ता रिटेंशन अलॉन्स थकित ठेवले आहेत अशा तक्रारी कामगार संघटनांनी केल्या आहेत. जर कारखान्यांना गाळप परवाने दिल्यास आयुक्तांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
कामगार संघटनेचे राजेंद्र तावरे यांनी सांगितले की, साखर कामगार हा साखर उद्योगातील महत्त्वाचा घटक असताना त्याच्या कष्टाचे वेतन थकवले जात असल्याचा अन्यायकारक प्रकार सुरू आहे. थकित पगारामुळे लाखो कामगार संकटात आहेत. आर्थिक अरिष्टामुळे जगणे मुश्कील झाले आहे. कारखान्यांच्या या भूमिकेविरोधात आम्ही या हंगामात आक्रमक आंदोलन करू. दरम्यान, साखर कामगारांचे वेतनसुद्धा दरमहा दहा तारखेच्या आत देणे बंधनकारक केले पाहिजे. याबाबतचा कायदा सुद्धा आहे. परंतु आजपर्यंत साखर आ कार्यालयाने दखल घेतलेली नाही. हे अन्यायकारक असल्याचे मत संघटनांचे आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.