कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले- पोर्ले येथील दत्त दालमिया साखर कारखाना, दालमिया फाऊंडेशन, नेटाफिम इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी युनिट हेड एस. रंगाप्रसाद होते. यावेळी कृषितज्ज्ञ अरुण देशमुख म्हणाले कि, ऊस लागण करताना कमी वयाचे आणि चांगल्या गुणवत्तेचे बेणे वापरल्यास उसाची उगवण ९० टक्के चांगली होते. शिवाय त्याचे तीन ते चार खोडवे पीक घेता येत असल्याने उत्पादन खर्चात बचत होते. लागण करताना शेतकऱ्यांनी एक डोळा अथवा रोप लागण पद्धतीचा अवलंब करावा. उसाची संख्या मर्यादित राखल्याने उसाची उंची, जाडीसह उत्पादनात वाढ होते.
रोप लागण पद्धत आडसाली आणि पूर्वहंगामासाठी फायदेशीर ठरत असल्याचे मतही कृषितज्ज्ञ देशमुख यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक शेती खातेप्रमुख संग्राम पाटील यांनी केले. यावेळी डॉ. अशोककुमार पिसाळ यांचे मार्गदर्शन झाले. यावेळी सुहास गुडाळे, शिवप्रसाद पडवळ, प्रशांत पाटील, नितीन कुरळूपे, प्रसाद मिरजकर, एम. एम. पाटील, शिवाजी चौगुले आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.