‘दौलत-अथर्व’मध्ये इथेनॉल प्रकल्प उभारण्याचा संकल्प : अध्यक्ष मानसिंग खोराटे

कोल्हापूर :चंदगड तालुक्यातील दौलत अथर्व साखर कारखान्याची गाळप क्षमता प्रती दिन दहा हजार टन करण्याचे नियोजन आहे. याशिवाय, कारखान्यामध्ये ३० मेगावॉटचा को-जनरेशन प्रकल्प आणि २०० केएलडी क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारण्याचा संकल्प आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक दर देता येईल, असे प्रतिपादन कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी केले. कारखाना कार्यस्थळावर यंदाच्या गळीत हंगामासाठी बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कारखाना यंदा सात लाख टन ऊस गाळप करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केले.

खोराटे म्हणाले, आगामी गळीत हंगामाच्या दृष्टीने कारखान्याने सर्व तयारी पूर्ण केली आहे. कार्यक्षेत्रातील उत्पादक शेतकरी, कामगार, तोडणी ओढणी यंत्रणा यांच्या सहकार्याने सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल.’ बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात प्रगतिशील शेतकरी प्रमोद ओऊळकर (तुर्केवाडी) व गणपतराव देसाई (बागीलगे) यांच्या हस्ते सपत्नीक विधी झाले. अॅड. संतोष मळवीकर, कारखान्याचे अध्यक्ष अशोक जाधव, संग्रामसिंह कुपेकर, जगन्नाथ हुलजी, बाळाराम फडके, बसवराज आरबोळे, संजय पाटील, प्रकाश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कारखान्याचे अधिकारी, शेतकरी, तोडणी ओढणी कामगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here