बीसीएल इंडस्ट्रिज लिमिटेड गोयल डिस्टलरीचे अधिग्रहण करणार; बायोगॅस प्लांट उभारण्याची योजना

फतेहाबाद : बीसीएल इंडस्ट्रिज लिमिटेडच्या संचालक मंडळाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित मासिक बैठकीत मेसर्स गोयल डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिग्रहणाला मंजुरी दिली आहे. हरियाणामधील फतेहबाद येथील गोयल डिस्टिलरीचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची घोषणा कंपनीने केली. या कंपनीकडे २५० केएलपीडी धान्यावर आधारित इथेनॉल युनिट स्थापन करण्यासाठी आवश्यक जमीन व परवानगी आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे धोरणात्मक अधिग्रहण बीसीएलला २५० केएलपीडी धान्यावर आधारित इथेनॉल प्लांटसोबत वीजेचा प्लांट स्थापन करून आपल्या उत्पादन क्षमतेचा आणखी विस्तार करण्यास सक्षम करेल. प्राथमिक इंधन स्रोत म्हणून भाताच्या भुश्याचा वापर केला जाईल. डिस्टिलरीची उभारणी नेहमीच्या कालावधीपेक्षा कमी वेळेत होऊ शकते, कारण कंपनीकडे आवश्यक मंजुरी आधीच आहे. त्यामुळे भटिंडा युनिटमधील १५० केएलपीडी आणि नव्या अधिग्रहीत फतेहबाद (हरियाणा) युनिटमध्ये २५० केएलपीडी वाढीनंतर बीसीएलची एकूण डिस्टिलरी क्षमता ७०० केएलपीडीवरून वाढून ११०० केएलपीडी होईल.

यामुळे भारतातील धान्य-आधारित इथेनॉल उत्पादनात अग्रणी म्हणून बीसीएलचे स्थान लक्षणीयरीत्या मजबूत होईल अशी अपेक्षा आहे. अधिग्रहणानंतर, ‘गोयल डिस्टिलरी’ ही बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी बनेल. अधिग्रहित केलेल्या ९ एकर जमिनीवर अंदाजे २० एमटीपीडी क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारण्याची कंपनीची योजना आहे. हा बायोगॅस प्लांट दररोज अंदाजे २५० मेट्रिक टन भाताच्या पेंढ्याचा वापर करेल, ज्यामुळे बीसीएलची शाश्वत उर्जा उपायांसाठीची वचनबद्धता आणखी मजबूत होईल. फतेहाबाद (हरियाणा) येथे डिस्टिलरी आणि बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी भांडवली खर्च अंदाजे १.५ कोटी रुपये आहे. त्याचा एकूण खर्च ३५० कोटी रुपये असेल. आणि उभारणीचा अपेक्षित कालावधी भूमिपूजनाच्या तारखेपासून सुमारे २० महिने आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here