बेळगाव : व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट साखर कारखान्यातर्फे स्वच्छता किट वितरण

बेळगाव : येथील व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट साखर कारखान्यातर्फे बेडकिहाळ ग्रामपंचायतीमधील सफाई कामगारांना स्वच्छता किटचे वितरण करण्यात आले. ग्रा. पं. सदस्य जीवन यादव यांनी स्वागत केले.ग्रामपंचायत कार्यालयासमोर सर्व सफाई कामगारांना मास्क आदी साहित्य असलेले किट वितरण करण्यात आले. यावेळी कारखान्याचे अधिकारी राजेंद्र कावणे, रामगौडा पवार, रामदास पाटील, ग्रा. पं. अध्यक्ष शिवानंद बिजले, ग्रामविकासाधिकारी प्रकाश सनदी, दत्तकुमार पाटील, संजय पाटील, सचिन पाटील, प्रशांत पाटील, विद्या देसाई, नानासाहेब पाटील, धनंजय मोहिते, संपत बोरगल, संजय नलवडे, मल्लाप्पा जनवाडे उपस्थित होते. शिवप्रसाद शेट्टी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here