लातूर : येथील रेणा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर शंभर रुपयांचा हप्ता बँकेत जमा करण्यात आला आहे. कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना विस्तारीकरणाचे काम पूर्ण करून कारखान्याची गाळप क्षमता २५०० वरून ४९५० करण्यात आली आहे. २०२३- २४ चा हंगाम यशस्वीरीत्या पार पाडला असून, कारखान्याने ६,२९,८५० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. कारखान्याची अंतिम एफ.आर.पी. ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा जाता रक्कम २६६७. ४९ प्रति मे. टन निश्चित झाली आहे.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख व जिल्हा बँकेचे चेअरमन, आमदार धीरज देशमुख यांच्या सूचनेप्रमाणे कारखान्याच्या नफ्यातून एफआरपी अतिरिक्त रक्कम प्रति टन शंभर रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे ३ ऑक्टोबर रोजी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. तसेच दीपावली सणाकरिता प्रती भाग शेअर्स ५० किलो साखर २५ रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने रोखीने शेती गट कार्यालयावर १ ते १० ऑक्टोबरपर्यंत विक्री करण्यात येत आहे. सभासदांनी गट कार्यालयातून वेळेत साखर घ्यावी, असे आवाहन चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा. चेअरमन, अनंतराव देशमुख, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे यांनी केले आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.