डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखान्याचा आज बॉयलर अग्निप्रदीपन

सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ च्या २५ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उद्या (ता. ८) सकाळी ९ वाजता कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मोहनराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोसले व त्यांच्या पत्नी सुप्रिया पुरुषोत्तम भोसले यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक शरद कदम यांनी दिली.

ते म्हणाले, गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. तोडणी वाहतुकीचे सर्व करारही पूर्ण झाले आहेत. तर कारखान्याची गाळप क्षमताही आता वाढविण्यात आली आहे. यावर्षी प्रतिदिन दहा हजार टन उसाचे गाळप केले जाणार आहे. भरपूर पाऊस झाल्याने उसाची वाढही चांगली झाली आहे. समारंभाला सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत. सभासद, ऊस उत्पादक, शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कदम यांनी केले.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here