कोल्हापूर : पंचगंगा – श्री रेणुका साखर कारखान्याकडून आयजीएम रुग्णालयाला रुग्णवाहिका प्रदान

कोल्हापूर : दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखाना लिज युनिट श्री रेणुका शुगर्स लिमिटेडतर्फे कबनूर गावाला घंटागाडी आणि इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटलला रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. याचबरोबरच दोन शुध्द पेयजल प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला. स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी आपल्या हयातीत कबनूर व कोरोची गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचीच विचारधारा पुढे नेण्याचे काम आम्ही संचालक करीत आहोत, असे प्रतिपादन पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांनी केले.

यावेळी रेणुका शुगर्सचे शिरीष राशनकर प्रमुख उपस्थित होते. सुनील शेरखाने, रेणुका शुगरचे गोविंद मिसाळे, कबनूरच्या सरपंच सुलोचना कट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाश कांबळे यांनी आभार यांनी स्वागत केले. अप्पर तहसीलदारांनी आभार मानले. ‘आयजीएम’चे सुपरिंटेंडेंट नंदकुमार बनगे, कारखान्याचे उपाध्यक्ष जयपाल कुंभोजे, संचालक प्रमोद पाटील, धनगोंडा पाटील, प्रताप पाटील, रावसो भगाटे, संतोष महाजन, सुनील तोरगल, प्रताप नाईक, बी. डी. पाटील, कोरोची सरपंच संतोष भोरे, उपसरपंच सुधीर लिगाडे, सुधीर पाटील, सैफ मुजावर, सुधाराणी पाटील, रोहिणी स्वामी, रजनी गुरव, अर्चना पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here