पिलीभीत : पिलीभीतमध्ये ऊस समिती निवडणुकीत अनियमितता झाल्याचा आरोप करत समाजवादी पक्षाच्या (एसपी) कार्यकर्त्यांनी जिल्हाभर जोरदार निदर्शने केली. जिल्हा प्रशासन भाजपच्या दबावाखाली काम करत असून बिगरभाजप उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊ दिले जात असल्याचा आरोप सपाने केला आहे. यांदरम्यान, सपाचे जिल्हाध्यक्ष जगदेव सिंह यांनी वादग्रस्त विधान करताना सांगितले की, लखीमपूरमध्ये भाजप आमदारासोबत जशी घटना घडली, तशीच परिस्थिती पिलीभीतमध्येही निर्माण होऊ शकते.
सपाच्या कार्यकर्त्यांनी पुरनपूर आणि बिसलपूर ऊस समितीबाहेर जोरदार निदर्शने केली. जिल्हा प्रशासनातील अधिकारी भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत सपाचे जिल्हाध्यक्ष जगदेव सिंह म्हणाले की, प्रशासन निवडणूक नीटपणे पार पाडत नाही. भाजप सत्तेचा गैरवापर करत लोकशाही प्रक्रियेला बाधा आणत आहे. भाजपच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्यांना अर्ज भरू दिले जात नाहीत. सरकारला जनतेचे हक्क दडपून सत्तेत राहायचे आहे.