रसापासून थेट इथेनॉल निर्मितीतून उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर शक्य : जैवइंधन शेतकरी संघटना

कोल्हापूर : राज्यात उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीचा सध्याचा दर प्रतिलीटर ६५ रुपये ६० पैसे असा आहे. त्यामुळे एफआरपीमधून होणारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी साखर निर्मितीऐवजी थेट इथेनॉल निर्मिती क्षेत्रात कार्पोरेट उद्योगांना परवानगी देणे आवश्यक आहे, असे मत जैवइंधन शेतकरी संघटनेचे आहे. गेल्या दहा ते बारा वर्षांपूर्वी इथेनॉलचा दर प्रतिलीटर केवळ २७ रुपये इतका होता. त्यानंतर २०१४ मध्ये हा दर प्रतिलीटर ४८ ते ४९ रुपये करण्यात आला. २९ जून २०१८ रोजी दिल्लीमध्ये झालेल्या ऊस परिषदेत जैवइंधन शेतकरी संघटनेने केलेल्या मागणीनुसार केंद्र सरकाने लवकर दरवाढ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत जैवइंधन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामराव देसाई म्हणाले की, भारतात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांत सर्वाधिक ऊस उत्पादन आहे. इथेनॉलचा सध्याचा दर लक्षात घेता उसाला प्रतिटन ४,५०० ते ५,५०० रुपये दर मिळू शकतो; परंतु महाराष्ट्रातील काही साखर कारखानदारांकडूनच कायमपणे इथेनॉल धोरणाला विरोध होत आहे. खरेतर थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती क्षेत्रात कार्पोरेट उद्योगाला उतरवावे. त्यामुळे उसाला प्रतिटन एफआरपी रुपये ३,००० ऐवजी मागणीने आणि किमतीने अधिक असलेल्या इथेनॉल निर्मितीतून प्रतिटन ४,५०० ते ५,५०० रुपये एवढा दर मिळू शकतो. इथेनॉल निर्मितीला विरोध हा दुर्दैवी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here