कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या ५३ वा गळीत हंगामाचे बॉयलर प्रदीपन करण्यात आले. कारखाना अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी सपत्नीक पूजा केली. मान्यवरांच्या हस्ते पूजाविधी आणि बॉयलर प्रदीपन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी कारखान्याने यंदाच्या हंगामात १६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकऱ्यांनी सर्व ऊस कारखान्याला पाठवावा, असे आवाहन केले.
दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील म्हणाले, शेतकरी व कामगारांचे हित जपण्याचे काम आपल्या कारखान्याने केले आहे. त्यामुळे सर्वांना पुढे घेऊन जाण्याची दृष्टी ठेवली आहे. संचालक अनिलराव यादव, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी कारखान्याच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक यांनी आभार मानले. संचालक मंडळ, कारखान्याचे सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.