मुंबई : सुधारित वेतनश्रेणीसह विविध 25 प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील साखर कामगार 16 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची घोषणा राज्य साखर कामगार प्रतिनिधी समितीने सोमवारी केली.समितीचे अध्यक्ष प्रदीप शिंदे व उपाध्यक्ष तात्यासाहेब काळे म्हणाले की, साखर कामगारांचा वेतनवाढ करार 31 मार्च 2024 रोजी संपुष्टात आला असून, साखर कामगारांच्या वेतनवाढीच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळेच सुधारित वेतनश्रेणीसह विविध 25 प्रलंबित मागण्यांसाठी 16 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. वेतनश्रेणी निश्चित करण्यासाठी व त्यांच्या सेवाशर्ती सुधारण्यासाठी तसेच साखर कामगारांची थकीत देणी देण्यासाठी शासनाने तातडीने समिती स्थापन करावी, अशी मागणी काळे यांनी केली.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.