लातूर : सिद्धी शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज येथे उदगिरातील धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अॅण्ड चॅरिटेबल हॉस्पिटल व सिद्धी शुगर यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस उत्पादक, परिसरातील नागरिक, कारखान्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मोफत सर्वरोगनिदान व औषधोपचार शिबीर रविवारी घेण्यात आले. उद्घाटन माजी मंत्री बाळासाहेब जाधव, डॉ. ऋषिकेश पाटील, डॉ. नेहा पाटील, व्हा. प्रेसिडेंट पी. जी. होनराव, प्राचार्य डॉ. दत्तात्रय व्ही. पाटील, जनरल मॅनेजर (केन) पी. एल. मिटकर यांच्या हस्ते झाले.
या शिबिरात डॉ. आयुब पठाण, डॉ. अतुल खडके, डॉ. मंगेश मुंढे, डॉ. उषा काळे, डॉ. अमोल पटणे, डॉ. सचिन टाले, डॉ. योगेश सुरनर, डॉ. मल्लिकार्जुन बिरादार, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. गुरुराज वरनाळे, डॉ. शिवकुमार मरतुळे, डॉ. नमृता कोरे, डॉ. प्रवीण बलुतकर, डॉ. शिवकांता चेटलुरे, डॉ. प्रमोद जमादार, डॉ. श्रुती तिवारी आदींनी रुग्ण तपासणी व उपचार केले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी कारखान्याचे धनराज चव्हाण, प्रशांत जाधव, अरविंद कदम, व्ही. एच. डोंगरे, धनंजय टिळक, हरिभाऊ पांचाळ यांनी परिश्रम घेतले. शिबिरात ९५७ जणांची मोफत आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले.