पुणे : ॲग्रीकॉस स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड (पुणे) च्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या प्रथम बैठकीमध्ये अध्यक्षपदी ॲड.अनंत जगन्नाथ चोंदे व नामदेव भालचंद्र चिंतामण यांची उपाध्यक्षपदी एकमतानी निवड झाली. संस्थापक, संचालक शेखर गायकवाड यांनी दोघांचे अभिनंदन केले. संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र व फक्त कृषी पदवीधरांसाठी देशातील पहिली ॲग्रीकॉस क्रेडिट को-ऑपरेटीव सोसायटीची स्थापना राज्याचे माजी साखर आयुक्त व ‘यशदा’चे अतिरीक्त महासंचालक शेखर गायकवाड (IAS) यांच्या मार्गदर्शनाखालीकरण्यात आली.संस्थेची प्रथम सर्वसाधारण सभा ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पुणे येथे शहर उपनिबंधक संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सपंन्न झाली.
सर्वसाधारण सभेने निवडलेले नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढीलप्रमाणे,
१)शेखर नारायण गायकवाड, २)ॲड.अनंत जगन्नाथ चोंदे, 3)नामदेव भालचंद्र चिंतामण, ४)सुनिल गोविंदराव पवार, ५)अजित ब्रम्हनाथ चौगुले, ६)डॉ. वंदन कृष्णराव मोहोड, ७)शिवानी दिलीप खंडार ८)डॉ. रजनीगंधा सचिन येवले ९)दिलीप ज्ञानदेव काशीद १०)किशोर बाबुराव डेरे ११)युवराज मानिकराव पाटील १२)ॲड.शिरीष उदधवराव यादव १३)गोविंद दगडुबा गिते १४)पुडलिंक विश्वंबर कदम १५) बंजरंग उध्दवराव मंगरुळकर
शेखर गायकवाड यांच्या संकल्पनेतून कृषी पदवीधर घटक समोर ठेवून व सर्वांच्या हितासाठी कार्य करण्यास संस्था कटीबद्ध राहिल, असा विश्वास नवनिर्वाचित संचालक मंडळाने व्यक्त केला. संस्थेच्या उभारणीसाठी सहकार आयुक्त दिपक तावरे, उपनिबंधक मिलिंद सोबले, दादासाहेब झगडे, डॉ. रामकृष्ण मुळे, यशवंत खैरे, दादाराम सप्रे, ईश्वर भटेवरा, सुरेश भावे, अजित आरेंजा, सोपान कांचन, यतिंद्र जोशी, मधुसुदन परांजपे, रविंद्र पवार, रविंद्र माने, यशवंत काळे, पांडूरंग बोरगावकर, डॉ. तुकाराम मोटे, मधुकर बोडखे, राम भरकड, आशिष बिरादार, एन. डी. राठोड, भासकर देशमुख, संजय बंटेवाड, विष्णू भोजे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.