अहिल्यानगर : ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात १२ ते १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखाना दररोज ११ हजार मेट्रिक टन ऊस तोडणीची व्यवस्था केली आहे, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष व माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दिली. कारखान्याच्या ५१ व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभात ते बोलत होते. कारखान्याचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार नरेंद्र घुले-पाटील यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ झाला. माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, ज्येष्ठ संचालक अड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, डॉ. क्षितिज घुले पाटील, काकासाहेब शिंदे, दिलीप लांडे उपस्थित होते. संचालक शिवाजीराव कोलते व निर्मला कोलते, बॉयलर अटेंडन्ट बापूसाहेब म्हस्के व संगीता म्हस्के यांच्या हस्ते विधिवत बॉयलर पूजा करण्यात आले. कार्यक्रमाला संचालक प्रा. नारायण म्हस्के, भाऊसाहेब कांगणे, जनार्दन अशोकराव मिसाळ, दादासाहेब गंडाळ, पंडितराव भोसले, जनार्दन कदम, गोरक्षनाथ गंडाळ, मच्छिंद्र म्हस्के, सखाराम लव्हाळे, दीपक नन्नवरे, लक्ष्मण पावसे, विष्णू जगदाळे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे, सुखदेव फुलारी, संभाजीराव माळवदे, बबनराव धस आदी उपस्थित होते. संचालक बबनराव भुसारी यांनी आभार मानले.