जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना- बारामती ॲग्रो लिमिटेड युनिटचा चौथ्या गाळप हंगामाचा प्रारंभ बॉयलर अग्नीप्रदिपन १८ रोजी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी व साखर कारखाना कर्मचारी कैलास चव्हाण सपत्निक यांच्या हस्ते करण्यात आले. ‘बारामती ॲग्रो’चे हे चौथे गाळप असून यावेळेस शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही. याची काळजी बारामती ॲग्रो घेणार आहे. तालुक्यासह आतापर्यंत शहादा, शिरपूर, चोपडा, भडगाव, यावल, धरणगाव, अमळनेर, चाळीसगाव परिसरातील एकूण १८ हजार ४०० एकर उसाची नोंद बारामती ॲग्रो कडे करण्यात आली आहे. यावर्षी तीन लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ‘बारामती ॲग्रो’ने ठेवले आहे.
यावेळी ‘बारामती ॲग्रो’चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, चोसाका चेअरमन चंद्रहास गुजराथी, व्हाईस चेअरमन गोपाळ धनगर, माजी चेअरमन डॉ. सुरेश पाटील आदींच्या हस्ते बॉयलर पूजन करण्यात आले. मार्च महिना संपेपर्यंत कारखाना सुरू राहील. बारामती ॲग्रोचे पूर्णपणे गाळपासाठी नियोजन केले आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. असे आवाहन उपाध्यक्ष गुळवे यांनी केले आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.