सोलापूर : श्रीसंत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासदांसाठी दिवाळी सणानिमित्त सवलतीच्या दराने दिली जाणारी साखर २५ ऑक्टोबर या कालावधीत वितरित केली जाणार आहे. प्रति किलो रु. २० प्रमाणे २५ किलो साखर दिली जाणार असल्याची माहिती चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली. सभासद बंधूंनी साखर विक्री केंद्रावर आपले साखर कार्ड नोंद करून वेळेत साखर घेऊन जावे, असे आवाहन व्हाईस चेअरमन तानाजी खरात यांनी केले आहे.
संबधित केंद्रावरून वेळेत न उचल केलेल्या सभासदांची साखर कारखाना साईटवर दर शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत डिसेंबर अखेरपर्यंत देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. याप्रसंगी संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, तसेच कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते.