सोलापूर : सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने २०२३-२४च्या गळीत हंगामासाठी गाळपास आलेल्या उसाला तिसरा व अंतिम हप्ता रक्कम ५० रुपये प्रती मे. टन दिला जाईल. तसेच दीपावलीनिमित्त कामगारांना १५ दिवसांचा पगार बोनस देऊ अशी घोषणा कारखान्याचे उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांनी केले. कारखान्याच्या गळीत हंगाम २०२४- २५ चा ५२ वा बॉयलरचे अग्निप्रदीपन नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे संचालक सुनील माने व पत्नी सविता माने यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली.
कार्यक्रमाला माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, संचालक अॅड. सुरेश पाटील, प्रफुल्ल कुलकर्णी, सुधाकर पोळ, बाळासो माने, रामचंद्र खुळे, सदाशिव पाटील शिवाजी रामदास कर्णे, ज्ञानदेव निंबाळकर, पोपट निंबाळकर, ज्ञानदेव पाटील, बलभीम निंबाळकर, स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, जनरल मॅनेजर रविराज जगताप आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.