अहिल्यानगर : मुळा कारखान्याचा ४७ व्या गळीत हंगामासाठी उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले व संचालक बाळासाहेब बनकर यांच्या हस्ते सपत्नीक बॉयलरची पूजा करण्यात आली. यंदाचा गळीत हंगामात १२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप यशस्वी करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी दिली. आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली गळीत हंगामाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. ऊसतोडणी, वाहतूक, गाळप यांसह दररोज १० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले जाणार आहे असे ते म्हणाले.
कारखान्याचे अध्यक्ष तुवर म्हणाले की, यंदाच्या हंगामासाठी कारखान्याकडे १७ हजार हेक्टर उसाच्या नोंदी झाल्या असून, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सूचनेनुसार व आमदार गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली १५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू होणार आहे. बॉयलर अग्निप्रदीपनचे पौरोहित्य अशोक कुलकर्णी व दिगंबर जोशी यांनी केले. बॉयलर पूजनप्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक, पानेगावचे उपसरपंच दत्तात्रेय घोलप, कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर, व्यवस्थापक शंकरराव दरंदले, सचिव रितेश टेमक, शेतकी अधिकारी, सभासद आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.