श्री तुळजाभवानी कारखान्याचे तीन लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : चेअरमन भावना मुंडे-बोर्डीकर

नांदेड : सेलू तालुक्यातील आडगाव दराडे येथील श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचा तृतीय बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा संपन्न झाला. या सुवर्ण महोत्सवी गळीत हंगामाचा तृतीय बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्या निमित्त बोलताना चेअरमन भावना मुंडे-बोर्डीकर यांनी असे सांगितले की, यावर्षी तीन लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. तृतीय बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ अभिजीत बोर्डीकर, धनश्री बोर्डीकर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, मीनाताई बोर्डीकर, आ. मेघना बोर्डीकर, टेक्निकल डायरेक्टर व्यंकटेश कदम, भोयर, सूर्यवंशी तसेच ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी ठेकेदार, वाहतूकदार व कर्मचारी व अधिकारी वर्ग उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here