मॉस्को: युक्रेनकडून रात्रभर झालेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे इथेनॉल प्लांटमध्ये स्फोट होवून आग लागली आणि रशियामधील इतर दोन इथेनॉल प्लांटचे नुकसान झाले आहे, असे रशियन अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. तांबोव्हचे गव्हर्नर मॅक्सिम येगोरोव्ह यांनी टेलिग्राम मेसेजिंग ॲपवर सांगितले की, रशियाच्या तांबोव भागातील बायोखिम बायोकेमिकल प्लांटमध्ये स्फोट झाला, त्यामुळे आग लागली. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे येगोरोव्ह यांनी सांगितले.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की त्यांच्या हवाई संरक्षण युनिट्सने एकूण १८ युक्रेनियन ड्रोन नष्ट केले. परंतु त्यांनी तांबोवचा उल्लेख केला नाही. तांबोव प्रदेश मॉस्कोच्या आग्नेयेला सुमारे ४५० किलोमीटरवर (२८० मैल) आहे. उत्तरेला मॉस्कोच्या सीमेला लागून असलेल्या तुला विभागाच्या गव्हर्नरनी मंगळवारी सांगितले की युक्रेनियन ड्रोन हल्ल्याने येफ्रेमोव्ह शहरातील दोन डिस्टिलरी आणि लुझकोव्स्की गावात नुकसान झाले आहे. तुलाचे राज्यपाल दिमित्री मिल्यायेव यांनी टेलिग्रामला सांगितले की, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि परिस्थिती नियंत्रणात आहे.
युक्रेनच्या गव्हर्नरनी सांगितले की, आणखी एका युक्रेनियन ड्रोन हल्ल्यात युक्रेन सीमेलगत असलेल्या रशियाच्या पश्चिम भागात ब्रायन्स्कच्या बॉयलर हाऊस आणि अनिवासी इमारतीचे नुकसान झाले. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. युक्रेनकडून तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. कीवने अनेकदा म्हटले आहे की, रशियामधील हवाई हल्ले युद्धाच्या प्रयत्नांत महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांना लक्ष्य करतात आणि मॉस्कोकडून युक्रेनियन प्रदेशावर सतत बॉम्बहल्ला करत आहेत.