सोलापूर : श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याच्या १५ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांच्या हस्ते झाला. यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ कर्मचारी बाळासाहेव शिंदे व सुवर्णा शिंदे या उभयतांच्या हस्ते सत्यनारायण पूजा व होमहवन पूजा करण्यात आली. कार्यकारी संचालक आसबे म्हणाले की, कारखान्याच्या येत्या गळीत हंगामासाठी १.७५ ते दोन लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यादृष्टीने मशिनरी दुरुस्ती व देखभालीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेसाठी अॅडव्हान्स वाटप करुन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. हंगामाचे ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला नोंदवलेला संपूर्ण ऊस श्री संत कूर्मदास कारखान्यास गाळपासाठी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे संस्थापक, चेअरमन अॅड. धनाजीराव साठे यांनी केले.
यावेळी व्हाईस चेअरमन सुधीर पाटील, मार्गदर्शक बी.डी. पाटील, संचालक दादासाहेव साठे, भालचंद्र पाटील, हरिदास खताळ, शशिकांत देशमुख, राहुल पाटील, विठ्ठल शिंदे, सयाजी पाटील, विजयसिंह पाटील, बाळासाहेब पाटील, मधुकर चव्हाण, नारायण गायकवाड, सिराज शेख, शंकर नाईकवाडे, संध्याराणी खरात, शालिनी कदम, कमल लोंढे, संजय इंगळे उपस्थित होते. स्वागत व आभार शेती अधिकारी दीपक कुलकर्णी यांनी मानले.