सोलापूर : सिद्धनाथ शुगर मिलच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामात पाच लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. कारखान्याचे चेअरमन दिलीप माने यांनी ही माहिती दिली. कारखान्याचे चेअरमन दिलीप माने, संचालक पृथ्वीराज माने, धनंजय भोसले यांच्या हस्ते काल सन २०२४-२५ च्या गळीत हंगामासाठी अग्निप्रदीपन सोहळा झाला. याप्रसंगी ते बोलत होते. शेतकरी हाच आपला केंद्रबिंदू असल्याचे सांगताना कारखान्याचे चेअरमन दिलीप माने यांनी आगामी गाळप हंगामाचे उद्दिष्ट स्पष्ट केले.
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर हंगामाची सुरुवात होईल. या गाळप हंगामात पाच लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तिन्हे गावचे सरपंच गोवर्धन जगताप, भास्कर सुरवसे, प्रोजेक्ट मॅनेजर विनोद पाटील, जनरल मॅनेजर संजीवकुमार जाधव, शेतकी विभागाचे मुख्य अधिकारी बाळासाहेब काळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, सिद्धनाथ कारखान्याने आपल्या ऊस उत्पादक, पुरवठादार शेतकरी सभासदांना दिवाळीनिमित्त साखर वाटप सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.