आग्रा : लुधियाना (पंजाब) येथील भारतीय मका संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी फतेहपूर कलान, सोरॉन येथे खरीप मका फील्ड डेचे आयोजन केले होते. यावेळी कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले की, मका पीक इथेनॉल उद्योगासाठी वरदान ठरले असून, या पिकातून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढत आहे.
‘आयआयएमआर’चे तुषार यादव यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, या प्रकल्पाचा मुख्य उद्देश मक्याची लागवड वाढवणे हा आहे. भातशेतीमुळे निर्माण होणारी पर्यावरणीय आणि कृषी आव्हाने सोडवता येतील. भात पिक उत्पादनासाठी प्रती किलो पाच लिटर पाण्याची गरज असते. त्यामुळे भूजल पातळी कमी होत आहे. पाचट जाळल्यामुळे वायू प्रदूषण होते. याउलट मका पीक शेतकरी आणि इथेनॉल उद्योगासाठी खूप फायदेशीर आहे. कृषी उपसंचालक महेंद्र सिंह, अतिरिक्त जिल्हा कृषी अधिकारी रणजित यादव, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. एल. जाट यांनी शेतकऱ्यांना मक्याच्या पेरणीपूर्व उपचार, तण व पोषक व्यवस्थापन आदींबाबत माहिती दिली.