सोलापूर : कुमठे येथील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचा ५२ वा बॉयलर प्रदीपन सोहळा मंगळवारी पार पडला. प्रारंभी ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर आणि कर्मयोगी स्व. आप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मळसिद्ध आणि त्यांच्या पत्नी पल्लवी शेंडगे यांच्या हस्ते होम पूजन करण्यात आले. कारखाना आगामी गळीत हंगाम २०२४-२५ साठी सज्ज असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बॉयलर प्रदीपन समारंभाला कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, जाफरताज पाटील, गुरुसिद्ध म्हेत्रे, माजी सभापती महादेव चाकोते, भारत जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीष पाटील, भीमाशंकर जमादार आदी उपस्थित होते. कारखन्याचे सचिव सिद्धेश्वर शिलवंत यांनी सूत्रसंचालन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धराम नाकोने यांनी आभार मानले.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.