वसमत : टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे १३ महिन्यांचे वेतन थकले आहे. त्यामुळे थकीत पगारासाठी कारखान्याच्या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. वारंवार मागणी करूनही वेतनाचा प्रश्न सुटत नसल्याने २३ ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांनी कारखान्याच्या गेटसमोर कामबंद आंदोलन सुरू आहे. कारखाना प्रशासनाने याकडे तत्काळ दखल घेऊन प्रश्न मार्गी काढावा, अशी मागणी कर्मचारी व शेतकऱ्यांतून होत आहे.
यापूर्वीही थकीत पगारासाठी २८ सप्टेंबर रोजी कारखाना गेटसमोर कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण केले होते. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा वेतन व पीएफ भरणा थकीत आहे. याबाबत आंदोलनानंतर तुळजाभवानी कारखान्याच्या अध्यक्षांनी मध्यस्थी करीत आंदोलन स्थगित करत १० ऑक्टोबरपूर्वी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतु, आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी आहे. ४० कायम कर्मचारी कामावर घेतले नसल्याने आणि त्यांना पगारही दिला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर दिवाळीत उपासमारीची वेळ आली आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.