अहिल्यानगर : वळपुरी सारख्या दुर्गम भागात साखर कारखाना उभारण्याचे मोठे धाडस कृषीनाथच्या संचालकांनी दाखविले. त्यांच्या या धाडसाला ऊस उत्पादकांनी मोठा प्रतिसाद दिला. ‘कृषीनाथच्या यशाचे श्रेय ऊस उत्पादकांना जाते, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. माळकूप (ता. पारनेर) येथील ढवळपुरी फाट्यावर कृषीनाथ साखर कारखान्याचा बॉयलर अग्रि प्रदीपन आणि गव्हाण पूजन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग राऊत होते.
खासदार नीलेश लंके व पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन पार पडले. यावेळी जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप, राज्य सहकारी बँकेचे मुख्य संचालक अनंत कुलकण, कॉसमॉस बँकेच्या सरव्यवस्थापक अपेक्षिता ठिपसे, माळकुपचे सरपंच संजय काळे, उपसरपंच राहुल घंगाळे, सरपंच नंदा गावडे, कृषीनाथचे अध्यक्ष महेश करपे, कार्याध्यक्ष रवींद्र भुजबळ, उपाध्यक्ष अनिल मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रकाश मते, सर्व संचालक मंडळ, ऊस उत्पादक उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.