सांगली : राजेवाडी येथील सदगुरु श्री श्री साखर कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामात कारखान्याने सात लाख गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याने शेतकऱ्यांसाठी दिवाळीनिमित्त १५० रुपयांचा हप्ता जाहीर केला आहे. या ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन एन. शेषागिरी राव यांनी दिली. कारखान्याने सुरुवातीपासूनच सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आहे. वजन काटा, पारदर्शकता, राजकारण विरहित कामकाज व गळीतास आलेल्या उसास प्रत्येक वर्षी चाचणी हंगामापासून एफआरपीपेक्षा जादा दर देणारा कारखाना हा नावलौकिक कायम ठेवण्याचे काम व्यवस्थापनाने केले आहे असे ते म्हणाले.
चेअरमन शेषगिरीराव यांनी सांगितले की, सद्गुरू साखर कारखान्याने उस दर देताना कधीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सभासद व बिगर सभासद असा भेदभाव केलेला नाही. कारखान्याने गतवर्षी ६ लाख १ हजार मे टन उसाचे गाळप करुन सभासदांना पहिला हप्ता २७०० रुपये दिला होता. आता दिवाळीला १५० रुपये यानुसर २८५० रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. यावर्षी कारखान्याने ७ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. उस उत्पादकांनी सद्गुरू साखर कारखान्याबरोबर आपली बांधिलकी व विश्वासहर्ता कायम ठेवावी. कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर उदयसिंह जाधव सर्व खाते प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.