सांगली : यंदा जिल्ह्यात सन २०२४-२५ या हंगामासाठी १ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात आडसाली, पूर्व हंगामी, सुरू खोडवा मिळून एकूण जिल्ह्यात सर्वाधिक ऊसक्षेत्र वाळवा तालुक्यात आहे. त्यापाठोपाठ मिरज, खानापूर तालुक्यात ऊस लागवड आहे. १ लाख ३७ हजार हेक्टरमध्ये ऊस गाळपासाठी तयार आहे. गळीत हंगामासाठी साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी, जत विश्वास, हुतात्मा, सोनहिरा क्रांती, दालमिया, सांगली दत्त इंडिया, तासगाव, श्री श्री राजेवाडी, आरग, उदगिरी, नागेवाडी, श्रीपती शुगर्स आदीसह १८ कारखाने सज्ज झाले आहेत. पण, निवडणुकीमुळे मजूर नोव्हेंबरअखेरीस जिल्ह्यात दाखल होऊन एक डिसेंबरपासूनच गळीत सुरु होण्याची शक्यता आहे.
शासनाने १५ नोव्हेंबरनंतर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पण, निवडणुकीच्या मतदानानंतरच येणार आहेत. त्यामुळे गळीत हंगामावर परिणाम होणार आहे. गेल्यावर्षी, २०२३-२४ च्या हंगामासाठी जिल्ह्यात १ लाख ४५ हजार हेक्टरमधील ऊस उपलब्ध होता. आधीच्या वर्षापेक्षा उसाची लागवड १५ हजार हेक्टरने वाढली होती. तर यंदा १५ दिवस गळीत हंगाम उशिरा सुरु होणार असून कारखान्यांसमोर ऊस आणि मजूर टंचाईचे मोठे आव्हान आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.