उत्तराखंड : शेतकऱ्यांची बनावट कागदपत्रे बनवून ३६ कोटींची फसवणूक, कारखान्याच्या दोन व्यवस्थापकांना अटक

डेहराडून : शेतकऱ्यांची बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यवधींचे कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी फरार झालेल्या इक्बालपूर साखर कारखान्याच्या तत्कालीन ऊस व्यवस्थापक आणि खाते व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर पंजाब नॅशनल बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक आणि अन्य आरोपी अद्याप फरार आहेत. संशयिताना पकडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. अमर उजालामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, तत्कालीन कारखाना व्यवस्थापक पवन धिंग्रा आणि खाते व्यवस्थापक उमेश शर्मा, पंजाब नॅशनल बँकेच्या इक्बालपूर शाखेचे तत्कालीन बँक व्यवस्थापक उमेश शर्मा आणि अन्य आरोपींनी अनेक शेतकऱ्यांची बनावट कागदपत्रे तयार केली. सर्वांनी शेतकऱ्यांच्या नावावर बँकेतून सुमारे ३६.५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. बँकेकडून शेतकऱ्यांच्या घरी कर्जविषयक नोटिसा पाठवण्यात आल्या. नोटीस आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

सीबीसीआयडीने या प्रकरणाशी संबंधित पाच जणांना नोटिसाही बजावल्या. मात्र त्यावर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आता पोलिस आणि सीबीसीआयडीने कारवाई करत तत्कालीन केन व्यवस्थापक आणि खाते व्यवस्थापकाला अटक केली. एसएसपी प्रमेंद्र डोवाल यांनी सांगितले की, केन मॅनेजर आणि अकाउंट मॅनेजरला न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. तर बँक व्यवस्थापकासह तीन आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इक्बालपूर कारखान्याचे तत्कालीन ऊस व्यवस्थापक पवन धिंग्रा हे सध्या लक्सर साखर कारखान्यात ऊस व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. तर तत्कालीन खाते व्यवस्थापक हे सध्या बेहट येथील शाकुंभरी साखर कारखान्यात खाते व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here