महाराष्ट्र : राज्यातील शेतकऱ्यांना साखर कारखाने सुरू होण्याची प्रतीक्षा

मुंबई : साखर कारखाने कधी सुरू होणार आणि उसाचा अंतिम दर किती मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सद्यस्थितीत परतीच्या पावसामुळे आणि विधानसभा निवडणुकीमुळे गळीत हंगाम लांबला आहे. जनावरांच्या वैरणीच्या टंचाईने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. हंगाम लांबल्यामुळे पुराचा फटका बसलेल्या उसाची तोडणी कधी होणार आणि त्या शेतात पुन्हा लागवड कधी करणार ? असा सवाल शेतकऱ्यासमोर आहे. कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकारने गळीत हंगामासाठी १५ नोव्हेंबरचा मुहूर्त घोषित केल्याने शेतकरी धास्तावले आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीमुळे हंगाम लांबला आहे. तसेच दराचा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषेदत पहिला हप्ता ३,७०० आणि मागचे २०० रुपये दिल्यानंतर उसाला कोयता लावणार, असा इशारा कारखानदारांना देण्यात आला आहे.

१५ नोव्हेंबरपासूनच गाळप हंगाम सुरू करण्याची ‘विस्मा’ची मागणी

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) ने शासनाच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांना मंत्रिमंडळाच्या 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार १५ नोव्हेंबरपासूनच गाळप सुरू करण्याची विनंती केली आहे. अप्पर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांना लिहिलेल्या पत्रात ‘विस्मा’ने म्हटले आहे की, यावर्षी अतिशय चांगला पाऊस, अनुकूल हवामान आणि थंडी सुरू झाल्याने ऊस पीक चांगले आले आहे. याशिवाय साखरेची रिकव्हरीही वाढण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये गाळप हंगाम 21 नोव्हेंबरपापासून सुरु होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. निवडणुकांमुळे गाळप हंगाम आणखी एक आठवडा उशिरा म्हणजेच 21 नोव्हेंबरला सुरु झाल्यास त्याचा सर्वाधिक आर्थिक फटका साखर उद्योगाला बसणार आहे.

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here