सोलापूर : श्री शंकर सहकारी साखर कारखान्यात गव्हाण, मोळी पूजन

सोलापूर : श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि; सदाशिवनगर २०२३-२४ चा ५१ वा गळीत हंगामाला सुरुवात झाली. कारखान्याच्या गव्हाणीचे व मोळीचे पूजन कारखान्याचे ज्येष्ठ सभासद चंदन तुपे, जगन्नाथ कोरटकर, मनोहर देवकर, ज्ञानदेव खुडे, जगन्नाथ महामुनी, साधू गोरे, मच्छिंद्र हुंबे, श्रीरंग तरडे, महादेव गेंड, सुभाष शिंदे, दस्तगीर मुलाणी, कृष्णदेव पवार आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. तर जि. प. उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या प्रमुख उपस्थित होते.

ऊस वाहतूक बैलगाडी मुकादम गणेश कोडलकर, शेतकरी सभासद अंकुश डुबल यांच्या बैलगाडीचे पूजन केले. यावेळी कै. काकासाहेब व अक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ सभासद यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून शंकर सहकारीचे चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील, खा. धैर्यशील मोहिते-पाटील उपस्थित होते. व्हा. चेअरमन, अॅड. मिलिंद कुलकर्णी, सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, जनरल मॅनेजर रविराज जगताप आदी उपस्थित होते.

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here