कोल्हापूर : यंदाच्या हंगामात साखर उत्पादन ३३३ लाख टन होण्याचा अंदाज इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) वर्तविला आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात आलेल्या उपग्रह प्रतिमांच्या आधारे व देशातील विविध साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीतून ‘इस्मा’ने होईल हा अंदाज व्यक्त केला आहे. ISMA ने देशात चालू असलेल्या इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामला (EBP) समर्थन देण्यासाठी आणि निर्यात संधी वाढवण्यासाठी पुरेसा साखर पुरवठा असेल, असा दावा केला आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रामध्ये ११८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा १११ लाख उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
‘इस्मा’च्या म्हणण्यानुसार, यंदा देशाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी ८५ लाख टन साखरेचा साठा देशात शिल्लक होता. यंदाचे साखर उत्पादन ३३३ लाख टन होईल. गेल्या वर्षीची शिल्लक व यंदाचे उत्पादन असे मिळून ४१७ लाख टन साखरेची उपलब्धता होईल. यापैकी २९० लाख टन साखरेची विक्री देशांतर्गत बाजारपेठेत होईल. ४० लाख टन साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी आणि पुढच्या हंगामासाठी ८७ लाख टन साखरेची उपलब्धता असेल. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रातील साखर उत्पादन वाढणार नाही, असा अंदाज ‘इस्मा’ने व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशात ही गेल्या वर्षी इतकीच म्हणजे ११० लाख टन साखर तयार होईल असे गृहीतक आहे.
राज्य 2023-24 (P) 2024-25 प्रथम आगाऊ अंदाज (नोव्हेंबर 2024)
महाराष्ट्र 118.48 111.02
कर्नाटक 58.08 58.07
उत्तर प्रदेश 110.00 110.10
इतर राज्ये 54.08 53.81
एकूण एकूण (अंदाज) 340.64 333.00
इथेनॉलसाठी वापर 21 –
निव्वळ साखर उत्पादन 319.64 –
(आकडे लाख टन)
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.