किसनवीर कारखाना सक्षमपणे चालवून एफआरपीपेक्षा जास्त दर दिला : आ. मकरंद पाटील

सातारा : अडचणीत असणारा किसनवीर कारखाना ताब्यात घेऊन शेतकऱ्यांच्या कल्याणाचा विचार करून एफआरपीपेक्षा जास्त दर आम्ही दिला. शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे मिळावेत म्हणून मिळणाऱ्या मंत्रिपदाचा त्याग केला आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी दोन्ही कारखान्यांना ४६७ कोटींचा निधी महायुती सरकारकडून मिळवला, असे प्रतिपादन आ. मकरंद पाटील यांनी केले. तालुक्यातील जांब येथील प्रचार सभेत ते बोलत होते. ‘किसनवीर’चे व्हा. चेअरमन प्रमोद शिंदे, सरपंच अभिजित शिंदे, संजय शिंदे, रियाज इनामदार, उपसरपंच विद्याश्री शिंदे, सुजाता शिंदे, दादासाहेब शिंदे, शंकरराव शिंदे आदी यावेळी प्रमुख उपस्थित होते.

आ. मकरंद पाटील यांनी सांगितले की, हातामध्ये एक रुपया नसताना दोन्ही हंगामामध्ये एफआरपीपेक्षा जास्त रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली. ज्या कारखान्याची जप्ती होणार होती, तो अडचणीत आलेला कारखाना सभासदांच्या आग्रहाखातर ताब्यात घेतला. किसनवीर कारखान्यासाठी सरकारकडून ४६७ कोटींचा निधी आणून शेतकऱ्यांची मागील सर्व देणी दिली. यावेळी प्रमोद शिंदे म्हणाले की, मकरंद आबा, नितीन काकांच्या कार्यकुशलतेमुळे अडचणीत असणारे कारखाने सक्षमपणे चालवून शेतकऱ्यांची सर्व देणी दिली. मागील हंगामातील सर्व पैसे आ. मकरंद पाटील यांच्यामुळेच शेतकऱ्यांना मिळाले. विकास शिंदे यांनी प्रास्तविक केले. संतोष शिंदे यांनी आभार मानले.

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here