परभणी : अमडापूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह शुगर एलएलपी या साखर कारखान्याचा सातवा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ नुकताच झाला. दिवाळी पाडव्याचे मुहूर्त साधून व्यवस्थापन, कर्मचारी प्रतिनिधी यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली. अग्निप्रदीपन प्रसंगी कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक अॅड. न.चि. जाधव, शशिकांत कदम, रामेश्वर भानुसे, ऊस पुरवठा अधिकारी विनायक पवार, नवनाथ कराळे, मोतीराम खटिंग यांच्यासह परिसरातील शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते. मागील सहा हंगामात कारखान्याने ऊस गाळप कामगिरीत सातत्य ठेवले आहे. सन २०२१-२२ यावर्षीच्या गळीत हंगामात ६.३१ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून कारखान्याने सर्वोच्च गाळपाचा उच्चांक गाठला. २०२२-२३ साली इथेनॉल प्रकल्पाला सुरुवात केली.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.