सातारा : जिल्ह्यातील सर्व १७ साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाने शेतकऱ्यांच्या एफआरपीचे पैसे देऊन या हंगामातील गाळप परवाने मिळवण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. बहुतांश साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिली आहे. साखर आयुक्त कार्यालयाने देखील टप्प्याटप्प्याने परवाने देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, २० नोव्हेंबर रोजी राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. यासाठी मराठवाडा, विदर्भातून जिल्ह्यात आलेले ऊसतोड कामगार जाणार असल्याने गाळप परवाने मिळाले तरी गाळप हंगाम हा विधानसभेच्या मतदानानंतरच सुरु होण्याची शक्यता आहे
जिल्ह्यात निवडणुकीमध्ये विधानसभा कारखान्यांचे संचालक मंडळांचे कार्यकर्ते गुंतलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला कारखान्यांचे प्रशासन गाळप परवाने मिळवण्याच्या धावपळीत आहेत. सर्व १७ साखर कारखान्यांनी गाळप परवाने मिळण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. प्रस्तावांना मंजुरी देण्याची प्रक्रिया साखर आयुक्त कार्यालयात सुरु आहे. गेल्यावर्षीच्या हंगामामध्ये जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस गाळपात भरारी घेतली होती. यात अजिंक्यतारा साखर कारखान्याने ७ लाख ५५ हजार, सह्याद्रीने १० लाख ५ हजार ६१०, किसनवीर भुईंजने ४ लाख ५३ हजार ७५८, स्वराज इंडियाने ४ लाख ८२ हजार ५८४, खटाव-माण पडळने ६ लाख १८ हजार ३९९, अजिंक्यतारा- प्रतापगडने ३ लाख १० हजार ५१ असे गाळप केले होते. सर्वच कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीच्या रकमा दिल्याने ते गाळप परवान्यासाठी पात्र ठरले आहेत.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.