बीड : येडेश्वरी कारखान्याच्या जडणघडणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते शेतकरी आणि कामगार यांचे हित कारखाना जपणार आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला एफआरपी पेक्षा जास्त भाव देणार आहे. तसेच कामगारांना समाधानकारक पगार दिला जाईल असे प्रतिपादन येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन खा. बजरंग सोनवणे यांनी केले. येडेश्वरी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या ११ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ चेअरमन खा. बजरंग सोनवणे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. शेतकरी कामगार पक्षाचे राज्य कमिटी सदस्य मोहन गुंड, माजी जिल्हा परिषद सदस्या सारिका सोनवणे व सोनवणे परिवार उपस्थित होता.
रामेश्वर व सीमा रामेश्वर उबाळे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. शेकाप नेते मोहन गुंड म्हणाले की, कारखान्याच्या माध्यमातून खा. बजरंग सोनवणे यांनी शेतकरी आणि कामगार वर्गासह तरुणांच्या हाताला काम देवून त्यांचे कल्याण केले आहे. कारखान्याचे संचालक प्रा. बाळकृष्ण भवर यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब गलांडे, नारायण शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नेते नवाब, बाळासाहेब बोराडे, पिंटू ठोंबरे, दिलिप गुलभिले, रमेश शिंदे, भाऊसाहेब गुंड, अशोक तारळकर, नारायण शिंदे, विलास जोगदंड, संजीवनी देशमुख, शंकर जाधव, बंडू चौधरी, लाला वायबसे, शितल लांडगे, नर्गिस बागवान, बाळासाहेब गलांडे, शरिफभाई सय्यद, राहुल खोडसे आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.