कोल्हापूर : ओलम ग्लोबल अॅग्री कमोडिटीजतर्फे (ओलम शुगर्स) आगामी गळीत हंगामात आठ लाख टन ऊस गाळप केले जाईल. कारखाना चंदगड, आजरा, गडहिंग्लजसह सीमाभागातील. उस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी दर देईल, असे प्रतिपादन ओलम ग्लोबल अॅग्री कमोडिटीजचे प्रमुख व बिजनेस हेड (इंडिया) भरत कुंडल यांनी केले. राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील कारखान्यात ऊस गव्हाणीत टाकून गाळप हंगामाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला युनिट हेड संतोष देसाई, मुख्य शेती अधिकारी दत्तराज गरड, टेक्निकल हेड जयदीप जैन, ऑपरेशन हेड शशांक शेखर, फायनान्स कंट्रोलर सुभाष डोरा, डिस्टिलरी हेड नरेंद्र रावत, इलेक्ट्रिकल हेड बाहुबली बेळवी, को-जनरेशन हेड राजू निर्मळे, ए. बी. अनिगिरी, हर्ष रावत, कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष गुरव, आदित्य चौधरी, कामगार युनियनचे सचिव रवळनाथ देवण, लक्ष्मण कडोलकर, कल्लाप्पा पाटील, अशोक नाईक, परशुराम ढवळे, अप्पया बेडी, दत्त कांबळे, लक्ष्मण मुन्नोळी आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.