सोलापूर: ओंकार कारखाना परिवाराने गेल्या दोन वर्षांपूर्वी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन केले होते. प्रतिदिन गाळप क्षमतेत वाढ, इथेनॉल, वीजनिर्मिती प्रकल्प, कंपोस्ट खत प्रकल्पाचे उद्घाटन झाले. या प्रकल्पांमुळे कारखान्याला आर्थिक बळ येईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला समाधानकारक दर देता येईल. ऊस उत्पादन शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस घालावा, असे आवाहन ओंकार समुहाचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांनी केले. ओंकार साखर कारखाना चांदापुरीच्या पाचव्या गळीत हंगामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. रायगड जिल्हा बँकेचे मुख्य अधिकारी मंदार वर्तक, रत्नागिरी बँकेचे मुख्य अधिकारी अजय चव्हाण, सिंधुदुर्ग बँकेचे मुख्याधिकारी प्रमोद गावडे, ठाणे जिल्ह्य बँकेचे मुख्याधिकारी सुनील पाटील यांच्या हस्ते नवीन प्रकल्पांचे उद्घाटन आणि गव्हाणीत उसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी निमगाव व तरंगफळ येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांचा सन्मान करण्यात आला. रामचंद्र मगर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संचालिका रेखा बोत्रे- पाटील, ओम बोत्रे-पाटील, जनरल मॅनेजर भीमराव वाघमोडे, चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ, शरद देवकर, तानाजी देवकते, पी.डी. पाटील, धन्यकुमार जामदाडे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी, वाहतूकदार उपस्थित होते. रमेश आवताडे यांनी आभार मानले.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.