सोलापूर जिल्ह्यात ऊसतोड कामगार दाखल होण्यास सुरुवात

सोलापूर : जिल्ह्यात आतापर्यंत ५० टक्केच यंत्रणा दाखल झाली असून ५० टक्के यंत्रणा निवडणुकीनंतरच जिल्ह्यात दाखल होईल, अशी शक्यता आहे. देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आहे. गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात १६४ लाख टन उसाचे गाळप झाले होते. यंदाचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, गळीत हंगामादरम्यान, विधानसभा निवडणूक आल्याने त्याचा परिणाम हंगामावर होताना दिसून येत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील जवळपास नऊ साखर कारखानदार यंदा विधानसभा निवडणुकीसाठी नशीब आजमावत आहेत.

विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी आहे. जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदार त्या-त्या भागातील मतदारसंघाचे गेम चेंजर आहेत. त्यामुळे बहुतांश साखर कारखानदार हे प्रचाराच्या रणधुमाळीत अडकले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतरच या भागातील ऊस तोड कामगार जिल्ह्यात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या वर्षी पावसाने मारलेली दडी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाचा झालेला वापर या कारणांमुळे यंदाच्या हंगामासाठी ऊस कमी असल्याचे दिसत आहे. याबाबत जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव म्हणाले की, यावर्षी उसाचे क्षेत्र जरी कमी असले तरीही जूनच्या सुरवातीपासून झालेला पाऊस, वेळेत भरलेले उजनी धरण व त्यानंतरही पावसाने लावलेली दमदार हजेरी यामुळे उसाचे वजन चांगले येईल. यंदाचा हंगाम शंभर ते १२० दिवसांचा होण्याची शक्यता आहे.

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here