…तर साखर कारखान्यांना गाळप परवाना देणार नसल्याचा साखर आयुक्तांचा इशारा

पुणे : राज्यातील ऊसतोड कामगारांना विविध कल्याणकारी व सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या महामंडळासाठी गाळप हंगाम २०२१-२२ मधील देय असलेल्या प्रती टन चार रुपयांपैकी तीन रुपयांचा भरणा केल्याशिवाय संबंधित साखर कारखान्यांना २०२४-२५ हंगामाचा गाळप परवाना देण्यात येणार नाही, असा इशारा साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला आहे. याबाबत आयुक्तांनी परिपत्रक जारी केले आहे.

साखर आयुक्तांनी ९ ऑक्टोबर रोजी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये झालेल्या गाळपावरील उर्वरित रक्कम प्रती टन चार रुपये ही हंगाम २०२३-२४ संपल्यानंतर १५ एप्रिल २०२४ पर्यंत भरणा करावी. गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये झालेल्या गाळपावरील रुपये १० प्रतिटनापैकी पाच रुपये निधीची रक्कम ही ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत व उर्वरित पाच रुपये रक्कम ही ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत भरणा करावी अशा सूचना वेळावेळी दिल्या आहेत. आता २०२१-२२ मधील देय रक्कम दिली नाही तर गाळप परवाना दिला जाणार नाही, असे पत्रात नमुद केले आहे. २३ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार याची अंमलबजावणी करावी अशा सूचना खेमनार यांनी दिल्या आहेत.

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here