बीड (महाराष्ट्र): जय महेश कारखाना उस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासत आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासावर कारखाना मार्गक्रमण करत आहे. यावर्षी माजलगाव जलाशय मोठ्या प्रमाणावर भरला असल्याने यावर्षी व पुढील गाळप हंगामातही उस उपलब्धतेचा प्रश्न राहणार नाही. कारखान्याची गाळप क्षमताही वाढविण्यात आली आहे. यावर्षी जय महेश कारखान्याने दहा लाख मेट्रिक टन उस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन कारखाना उपाध्यक्ष जे. वेंकटराव यांनी केले. जय महेश कारखान्याच्या मोळी पूजन कार्यक्रमात दि. १३ रोजी, बुधवारी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पवारवाडी येथील खाजगी तत्वावरील जय महेश साखर कारखान्याने नूतन गळीत हंगामासाठी मोळी पूजन केले. गाळप हंगामात दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असुन उस उत्पादक शेतकऱ्यांनी उस गाळपास देउन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याच्यावतीने करण्यात आले. कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी सुजय पवार व साधना पवार दाम्पत्यांच्या हस्ते मोळी पुजन करण्यात आले. यावेळी अरप्पन, राजशेखर यांच्यासह सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी, ठेकेदार मजूर, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.