बीड : साखरेबरोबरच उप पदार्थांचे उत्पादन होणार असल्यामुळे जयभवानी कारखाना उसाला चांगला भाव देण्यास सज्ज आहे. बायप्रॉडक्टवर लक्ष केंद्रित करत १.१० लक्ष बल्क लिटर क्षमतेचा डिस्टलरी प्रकल्प पुढील हंगामात कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे निधी उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांच्या ऊसाला जादा दर देताना अडचण येणार नाही, असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव पंडित यांनी केले. शिवाजीनगर गढी येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या ४२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. माजी चेअरमन जयसिंग पंडित, व्हा. चेअरमन भाऊसाहेब नाटकर प्रमुख उपस्थित होते.
शिवाजी महाराज आणि कारखान्याचे कर्मचारी राजेंद्र नवले व शंकर ढाकणे यांच्या हस्ते विधीवत पूजा करून गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. कारखाना साईटवर पोहचलेले पहिले वाहनमालक, दत्तात्रय दगडू गव्हाणे यांना महंत शिवाजी महाराजांच्या हस्ते रोख स्वरूपात पारितोषिक देण्यात आले. माधव चाटे यांनी सूत्रसंचालन केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विकास सानप, अॅड. परशुराम येवले, बिपीन डरपे यांच्यासह संचालक सर्वश्री, जगन्नाथ शिंदे, संभाजीराव पवळ डॉ. आसाराम मराठे, संदीपान दातखीळ, जगन्नाथ दिवाण, कुमारराव ढाकणे, गणपत नाटकर, जगन्नाथ काळे, बाबुराव काकडे, साहेबराव चव्हाण, सुभाषराव मस्के, मुख्य लेखापाल सौरभ कुलकर्णी, परचेस ऑफिसर सोळुंके, संगणकप्रमुख धनाजी भोसले उपस्थित होते.