बीड : गंगा माऊली शुगर ने परिसरातील शेतकऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा व ऊस तोडणी कामगारांचा विश्वास संपादन केला आहे, असे मत कारखान्याच्या संस्थापक संचालक खा. रजनीताई पाटील यांनी व्यक्त केले. कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. अशोक पाटील, कारखान्याचे चेअरमन लक्ष्मणराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. लक्ष्मणराव मोरे हे अतिशय उत्कृष्टपणे हा कारखाना चालवत आहेत. त्यामुळे आमचे जे स्वप्न होत ते आता खऱ्या अर्थाने पुर्ण होत असल्याचे खा. रजनीताई पाटील यांनी सांगितले.
यावेळी नवनाथ थोटे, आणासाहेब बोधले महाराज, उद्धव बापू आपेगावकर, राहुल सोनवणे, बाबाराजे देशमुख, आपासाहेब ईखे, प्रकाश भन्साळी, हनुमंत मोरे, प्रविण मोरे, अविनाश मोरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक मुजावर, मुख्य शेतकरी अधिकारी अविनाश आदनाक यांचेसह सर्व संचालक, शेतकरी, कारखान्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.