देशातील चार राज्यांमध्ये इथेनॉलचे पंप उभारणार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कोल्हापूर:पेट्रोल सारख्या इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. यापूर्वी मक्याला बाराशे रुपये क्विंटल पर्यन्त दर मिळत होता. मक्यावर आधारित इथेनॉल प्रकल्प झाले आणि इथेनॉलला दुप्पट दर मिळू लागला. औद्योगीकरणाबरोबरच शेतकऱ्यांच्या हितासाठी ही केंद्राने प्रयत्न केले. लवकरच महाराष्ट्रासह चार राज्यांत इथेनॉलचे पंप उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ शहापूर चौकात झालेल्या निर्धार सभेत ते बोलत होते.

मंत्री गडकरी म्हणाले की, मला ज्या ज्या वेळी कारखानदार भेटतात त्यावेळी ते इथेनॉलच्या प्रकल्पाबाबतची उपयोगिता सांगतात. केवळ साखरेपासूनच इथेनॉल तयार न करता मका व बांबू सारख्या पिकापासून ही इथेनॉल तयार करण्यासाठीही आम्ही प्रयत्न करत आहोत. इथेनॉलच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असून त्यावर आता वाहने चालणार आहे. त्यासाठी सर्व कंपन्यांकडून वाहनांची निर्मिती सुरू आहे. केंद्र सरकारने अलीकडच्या काळात इथेनॉल उत्पादन वाढीसाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. आर्थिक अरिष्टात असणाऱ्या साखर उद्योगाला इथेनॉल निर्मितीने मोठा आधार दिला. आज जे साखर कारखाने सावरले, त्यामध्ये मोठा वाटा इथेनॉलचाही आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here