लातूर : श्री संत शिरोमणी मारूती महाराज सहकारी साखर कारखाना २०२४- २५ च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज माकणीकर यांच्या हस्ते व संत शिरोमणी मारुती महाराज कारखान्याचे चेअरमन शाम रविंद्र भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी संचालक मंडळाचे वतीने कारखान्याचा गळीत हंगाम २०२४ २५ वेळेत सुरू करून पूर्ण क्षमतेने गाळपाचे उदिष्ट साध्य करण्यासाठी कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून हंगामात सर्वोच्य साखर उतारा प्राप्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्र. कार्यकारी संचालक आर. बी. बरमदे यांनी यावर्षी कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून गाळपाचे उदिष्ट शासन आदेशाप्रमाणे गाळप सुरू करण्यासाठी कारखाना सज्ज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास कारखान्याचे व्हा. चेअरमन सचिन पाटील, संचालक अॅड श्रीपतीराव काकडे, शामराव साळुंके, गणपती बाजुळगे, सुभाष जाधव, अॅड. बाबासाहेब गायकवाड, भरत माळी/फुलसुंदर, संतोष भोसले, रमेश वळके, अनिल पाटील, विलास काळे, गोविंद सोनटक्के, चंद्रसेन पाटील, ऊस उत्पादक सभासद शेतकरी, अधिकारी चिफ इंजिनिअर सुनिल पवार, डे. चिफ इंजिनिअर राजेंद्र साळुंके, चिफ केमिस्ट आण्णासाहेब मोरे, चिफ अकौंटट गोपाळ चव्हाण, डे. चिफ अकाउंटंट हदयनाथ बोडके, कार्यालयीन अधिक्षक सुर्यकांत सावंत तसेच कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.