सोलापूर : माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक येथील ‘भैरवनाथ शुगर’च्या सातव्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. चालू हंगामात चार लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून ऊस उत्पादकांनी सहकार्य करावे, असे आवाहन भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत यांनी केले.
प्रास्ताविकात भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत यांनी नोंदीप्रमाणे ऊस तोड दिली जाणार असल्याचे सांगितले.भैरवनाथ शुगरचे चेअरमन शिवाजीराव सावंत म्हणाले की, यावर्षी आलेगाव युनिटचे ४ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना जो दर देईल त्याप्रमाणे ऊस दर देण्याचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी, वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत, वडोलीचे सरपंच तानाजी गाडे, जनरल मॅनेजर सुरेश पाटील, प्रोसेस जनरल मॅनेजर पोपट क्षीरसागर, चीफ अकाउंटंट विठ्ठल काळे, शेती अधिकारी कांतीलाल टेळे, अरविंद खरात, भजनदास खटके, विकास गाडे, निवृत्ती तांबवे, अरुण गाडे, अजिंक्य काटे, स्वप्नील खरात, स्टोअर किपर सुधीर पाटील, सिव्हिल विभाग प्रमुख राहुल खटके, सुरक्षा अधिकारी रावसाहेब आजबे, इडीपी मॅनेजर प्रवीण बर्गे, हेड टाईम कीपर सुमित साळुंखे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले. आभार निलेश देशमुख यांनी मानले.